मराठी पत्रकार संघाचे पंढरपूर शहरअध्यक्ष पदी दिनेश खंडेलवाल तर तालुका अध्यक्षपदी मिलिंद यादव बिनविरोध निवड
पंढरपूर(प्रतिनिधी):- मराठी पत्रकार संघ पुणे महाराष्ट्र राज्य आयोजित पंढरपूर पत्रकार पदाधिकारी पद ग्रहण सोहळा पंढरपूर येथील पत्रकार भवन मध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना पंढरपूर नगरपालिका नूतन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पंढरपूर शहर विकासाबाबत माहिती दिली. आषाढी वारीच नव्हे तर चारही वाऱ्या व नित्य येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा कशा देता येतील यासाठी सर्व पत्रकार सहकाऱ्यांना बरोबर घेऊनच कार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले. तसेच अनेक वर्षे रेंगाळत असलेला पत्रकार गृहनिर्माण प्रश्न लवकरच बैठक घेऊन मार्गी लावण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी पुढील वर्षांपर्यंत आपल्या सर्व बांधवांच्या घरांची पायाभरणी झालेली असेल. त्यासाठी शासन स्तरावर येणाऱ्या सर्व अडचणी सोडवून संघ भावना जागृत ठेवण्याचे सूतोवाच केले. पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांना सर्व मोफत उपचारासाठी पुणे येथे संपन्न दवाखान्यात सोय करणार असल्याची माहिती दिली.
यावेळी जेष्ठ पत्रकार महेश खिस्ते यांनी उपस्थित नवोदित पत्रकारांना पत्रकारिता हे व्रत आहे ते टिकवणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन केले.
यावेळी मराठी पत्रकार संघाचे सचिव शिबु नायर,महाराष्ट्र प्रदेश सहसचिव हरिभाऊ प्रक्षाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज बिबवे
उपस्थित होते.
मराठी पत्रकार संघाचे नूतन शहर अध्यक्ष पदी दिनेश खंडेलवाल यांची तर शहर सहअध्यक्षपदी विनोद पोतदार,
उपाध्यक्षपदी नवनाथ खिलारे, राजेंद्र ढवळे,सचिवपदी अपराजित सर्वगोड
तर तालुका अध्यक्षपदी मिलिंद यादव तर उपाध्यक्षपदी अमोल कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.
सर्व पदाधिकारी ओळखपत्रे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभाऊ यांनी केले तर सुत्रसंचलन अमोल कुलकर्णी यांनी केले. यावेळी अध्यक्ष संजय कोकरे, सहसचिव विकास पवार, अविनाश उत्पात,ज्ञानेश्वर शिंदे, अविनाश साळुंखे,विकास सरवळे,महालिंग दुधाळे, बालम मुलाणी,राजू बाबर, सावता जाधव, वनसाळे,दत्ताजीराव पाटील, महेश कदम, अमोल माने, सचिन माने, राजेश शिंदे, रामकृष्ण बिडकर, सागर आतकरे, मुजम्मील कमलीवाले, कबीर देवकुळे, अमोल गुरव,आदींसह पत्रकार संघाचे सदस्य व बांधव उपस्थित होते.
सर्व नूतन पदाधिकारी यांची लवकरच बैठक होऊन पुढील वाटचाल ठरवण्यात येणार आहे.