*संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही : आमदार प्रणिती शिंदे*

प्रतिनिधी:-

काही विचारसरणीचे लोक आणि पक्ष आज संविधान बदलण्याचे भाष्य करत आहेत.मात्र संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही. त्यामुळे आज डॉ. बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर आपल्या देशात संविधान बदलण्याचे जे षडयंत्र चालू आहे, त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणतीही भेदभाव, जात, धर्म जमात न पळता सगळ्यांनी एकत्र येऊन या शत्रूच्या विरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रयास मागासवर्गीय बहुद्देशिय संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे संविधान बचाव अभियानांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूदायिक वाचन करण्यात आले. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती लावत संविधानाच्या उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनामध्ये सहभाग नोंदवला.

यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जो संघर्ष करत होते, तो हाच खरा संघर्ष असावा. हीच ती खरी चळवळ असून हीच आपल्या परीक्षेची वेळ आहे. कारण बाबासाहेबांनी दिलेले संविधान बदलण्याचे कोणी भाष्य करत असेल, त्याच्या विरोधात सगळ्यांनी उभे राहणे गरजेचे आहे, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

संविधान बदलण्याची भाषा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असेल तर त्याचा आपण सर्वांनी निषेध करायला हवा. ही जी चळवळ आहे, हा संघर्ष आहे तो आता सुरू होण्याची वेळ आहे. ठीक ठिकाणी संविधानाचे वाचन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शपथ घ्यायला पाहिजे की, आम्ही संविधान बदलू देणार नाही. उद्या संविधानाच नाही राहिले तर लोकशाही राहणार नाही आणि लोकशाही राहिली नाही तर हा देश विकृत मानसिकतेच्या लोकांच्या हातात जाईल, आणि देशच राहणार नाही त्यामुळे ही खरी परीक्षा आहे, असे मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, सचिन शिंदे, प्रमिला तूपलवंडे, गणेश डोंगरे, बाबा करगोळे, सुशीला आंबुटे, मधुकर आठवले, नागनाथ कदम, भोजराज पवार, नरसिंह असोदे, अनिल मस्के, बसवराज म्हेत्रे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, श्रीकांत दासरी, नागेश म्हेत्रे, लखन गायकवाड, तिरुपती परकीपंडला, परशुराम सतारेवाले, अंबादास गुत्तीकोंडा, सुहास जाधव, बालाजी जाधव, अनुपम शहा, सुभाष वाघमारे नागनाथ शहाणे, उमेश सुरते, संजय गायकवाड आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here