पंढरपूर
मुंबईतील कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या
एका विठ्ठल भक्ताची अखेर ची ईच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल भक्ताच्या पत्नीने तब्बल एक कोटी रुपयाचे गुप्तदान विठ्ठल मंदिर समितीला दिले.
असून आपले नाव गुप्त ठेवण्याची ही विनंती केली आहे.
मुंबई येथील एक तरुण विठ्ठलभक्त करोना संसर्गाची लागण होऊन दोन महिन्यांपूर्वी मयत झाला. विठ्ठलावर असलेल्या अपार श्रद्धेमुळेच त्याने मृत्यूसमयी आपली पत्नी आणि आईला बोलावून निधनानंतर विमा कंपनीकडून येणारी सर्व रक्कम विठुरायाला अर्पण करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. काही दिवसांतच या विठ्ठल भक्ताचे निधन झाले.
पतीच्या निधनानंतर आलेली विमा रक्कम पतीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठीविमा कंपनीकडून आलेली १ कोटी रुपयाची रक्कम मंदिर समिती दान देण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांपूर्वी ही महिला आपली मुलगी आणि सासूला घेऊन पंढरीत आली आणि 1 कोटी रुपये धनादेश स्वरूपात देऊन गेली.
माझ्या पतीचे निधन झाले असून पतीच्या इच्छेनुसार आपण एक कोटी रुपयांची देणगी दिल्याची माहिती बाहेर आल्यास आपल्या कुटुंबाला त्रास होऊ शकेल. त्यामुळे आपले अथवा आपल्या दिवंगत पतीचे नाव आणि देणगी रक्कम गुप्त ठेवण्याची विनंती या विधवा पत्नीने केली होती.
आज एका कर्मचाऱ्याकडून ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली.