व्यवसायिकांना हनीट्रॅपमध्ये अडकवून गुन्हेगार मित्रांच्या मदतीने अनेकांना लुबाडणार्या तरुणीसह 6 जणांना कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 72 तासात अटक् केली.
ह्या गुन्ह्यातील तरुणी केवळ 9 वी पास आहे. मात्र सोशल मीडियाचा वापर करण्यात ती पटाईत आहे. तिचा पती खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात गेला आहे. त्या दरम्यान पतीच्या गुन्हेगार मित्राचा मदतीने हा हनी ट्रॅपचा सापळा लावला. अनेकांनी अब्रु जाण्याच्या भितीने ही टोळी मागेल तितके पैसे देऊन आपली सुटका करुन घेतली. मात्र, न्यू पनवेल येथील एका व्यावसायिकाने मात्र, पोलिसांकडे जाण्याचे धाडस दाखवून कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली. त्यातून पोलिसांनी हा हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस आणला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
यांनी कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील , तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे
व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.
रवींद्र भगवान बदर (वय 26, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा.येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40, रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा. बाणेर, मूळ सोलापूर माढा),
मंथन शिवाजी पवार (वय 24, रा. इंदापूर) आणि 19 वर्षांची तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या टोळीतील 19 वर्षांच्या तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पनवेलच्या व्यावसायिकासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले.
तिने व्यावसायिकाला भेटण्यासाठी कोंढव्यातील येवलेवाडी येथे बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
या तरुणीच्या साथीदारांनी व्यावसायिकाकडे 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली.
या वेळी व्यावसायिकाच्या खिशातील 50 हजारांची रोकड व त्यांच्याजवळील एटीएम कार्डद्वारे 30 हजार असे 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यावसायिकाला सतत फोन करत होते.
शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली होती.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस अंमलदार गणेश चिंचकर यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
तरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधित तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.
तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.पैसे मागण्यासाठी संपर्क केला अन् जाळ्यात अडकले.
फिर्यादी यांना या टोळीने प्रकरण मिटविण्यासाठी 50 लाखांची मागणी करुन 5 लाख रुपये देण्याचे ठरले होते. घटना घडली. त्यावेळी त्यांनी 70 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते.
राहिलेले 4 लाख रुपयांसाठी आरोपी फिर्यादीला फोन करत होते.
या व्यवसायिकाने फिर्याद देताना याची माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींचा माग काढला. त्यानंतर सर्वांना अटक केली. त्यांच्याकडील मोबाईलमध्ये त्यांनी अनेकांशी असा संवाद साधला असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे त्या मोबाईलची सायबर तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
*संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन*
ही तरुणी सोशल मीडियावर प्रगती जाधव या नावाने संपर्क धून ओळख करायची.
ओळख वाढवून त्याला पुण्यात भेटायच्या बहाण्याने बोलवयाची.
त्याच्याशी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर शरीरसंबंध प्रस्थापित करत असे.
त्यानंतर त्या टोळीतील इतर जण या सावजाला अडवून मारहाण करुन ब्लॅकमेल करीत व त्याच्याकडून पैसे लुबाडत असत.
या टोळीने अनेकांना अशा प्रकारे लुबाडले असण्याची शक्यता आहे.
अनेकांनी भितीपोटी किंवा अब्रुला घाबरुन तक्रार देण्यास पुढे आलेले दिसत नाही.
अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.