खा. डॉ.अमोल कोल्हे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना ची लागण

कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणे दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरी टेस्ट केल्यानंतर माझा RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु प्रकृती स्थिर आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचे मतदारसंघातील पूर्वनियोजित सर्व दौरे आणि कार्यक्रम पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा, सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करुन घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावीत. निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here