प्रतिनिधी :-
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे प्रतिनिधी हे सर्वसामान्य जनतेचे काम करत असताना हा कुठल्या पक्षाचा आहे हा कुठल्या गटाचा आहे हा कुठल्या जातीचा आहे ही चौकशी करून जनतेची कामे न करता सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. तरी सदर धर्मांध पक्षाच्या उमेदवाराला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन रांजणी या गावी प्रचाराचा नारळ फोडुन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना म्हणाले की विरोधक सांगतात आम्ही हजारो कोटीची कामे केली. असे सांगणारे उमेदवाराने फक्त कागदावरच कामे केली आहे प्रत्यक्षात मात्र ठेकेदारांचे भले केल्याचे दिसून येत आहे. खोटे बोल पण रेटून बोल हा उमेदवाराचा फंडा असून त्याला जनता धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळावा म्हणून शेतकरी आंदोलन करीत आहेत सध्या सर्व प्रकारचे दर वाढले असून शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. शेतीमालाचा भाव असो किंवा पाण्याचा प्रश्न असो याबाबत कधीही विधानसभेमध्ये आवाज उठवल्याचे पहावयास मिळत नाही .त्यामुळे येत्या वीस तारखेला अशा बिन कामाच्या प्रतिनिधीला बदलण्याची वेळ आली आहे .
मी महाविकास आघाडीचा धर्म पाळणारा माणूस असून आत्ताच शिवसेना पक्ष नेते उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून मतदारसंघातील परिस्थिती सांगितली. माझे म्हणणे ऐकून घेऊन त्याने शिवसेना पक्ष हा आपल्या सोबत आहे आपण काळजी करण्याची गरज नाही . शिवसेना पक्ष युतीबरोबर असून पक्षाचा आपणाला पूर्ण पाठिंबा राहील तशा सूचनाही आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केल्या आहेत. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची आह. ही निवडणूक जनतेच्या हातात गेले असून आपला विजय हा निश्चित आहे गावोगावी फिरत असताना मला मिळणारा प्रतिसाद तसेच लोकांकडून, मायमाऊलीकडून होत असलेली मदत हीच माझ्या कामाची पोच आहे. आमदार भगीरथ दादा भालके यांनी यावेळी सांगितले स्वर्गीय भारत नाना भालके यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनता मला भरघोस मतांनी निवडून देईल . नानाने कधीही सुडाचे राजकारण केले नाही. सर्व जनता आपलीच आहे जनतेच्या अडचणी सोडून त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन वेळप्रसंगी त्यांना आर्थिक मदत करून राजकारण केले आहे. तोच वारसा मी पुढे जपून राजकारण करेन माझे चिन्ह हाताचा पंजा असून येत्या 20 तारखेला हाताच्या पंजाब पुढील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे व अशा जातीवादी पक्षाच्या उमेदवाराला घरी बसवावे एवढीच विनंती मी आज तुमच्या समोर करत आहे.
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असताना प्रत्येक समाजाला झुलवत ठेवण्याचे काम आज सत्ताधारी मंडळींनी केले आहे. महागाई बेरोजगारी व इतर प्रश्न आवासुन उभे आहेत. येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही असे आव्हान प्रचार सभेमध्ये आपले विचार व्यक्त करताना माडले.