*माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मेजवानी*
(विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणार माढ्यामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचा थरार)
प्रतिनिधी /-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून व विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माढा कृषी व संस्कृती महोत्सव २०२४ या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या महोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य शामियाना आणि मंडप पूजन अभिजीत पाटील यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय सोलापूर रोड माढा येथे करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १२ ते बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ या पाच दिवस चालणाऱ्या कृषी व सांस्कृतिक महोत्सवामध्ये कृषी विषयक तज्ञांचे मार्गदर्शन, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत संस्कृती कार्यक्रम तसेच साहित्य आणि प्रदर्शन येथील नागरिकांना पाहावयास मिळणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या दिवशी सकाळी १० वाजता भव्य शेतकरी मेळाव्याने होणार आहे. या दिवशी दसरा असल्याने सायंकाळी ६ वाजता रावण दहन या कार्यक्रमाचे करण्यात आले आहे. तसेच रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचे मार्गदर्शन, सायंकाळी ६ वाजता अभिनेत्री मानसी नाईक यांचा महाराष्ट्राचे हास्यविर कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे मार्गदर्शन तसेच सायंकाळी ६ वाजता ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तन व भारुड कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता नफ्यातील दुग्ध व्यवसाय या विषयावर गंगाप्रसाद पाटील यांचे मार्गदर्शन आणि सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचे कॉमेडी कलाकार भाऊ कदम व मकरंद अनासपुरे यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता अरुण देशमुख कृषी विद्या विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन व सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्राचा महागायक आनंद शिंदे यांचा लोकगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ येथील नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
यावेळी प्राचार्य सुनील हेळकर सर, अनिलकाका देशमुख मानेगाव, आबासाहेब साठे, ऋषीकाका तंबिले, अक्षय शिंदे, जितु जमदाडे,स्वाभिमान कदम उपस्थित होते.