महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होईल. प्रा.रमेश शिंदे

पंढरपूर प्रतिनिधी दि.27- महिलांची सोशिकता, दांभिकता, सहनशिलता या पारंपारीक विषयांना छेद देत महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होत आहे. याचा प्रत्यय सौ.स्मिता कवडे यांच्या इथे ओशाळल्या वेदना या कादंबरीतून वाचकांना येतो. कवडे यांची ही कादंबरी महिलांच्या विद्रोही रुपाचे पहिले पाऊल ठरेल असा विश्वास समिक्षक प्रा.रमेश शिंदे यांनी व्यक्त केला.
सौ.स्मिता दिलीप कवडे लिखित इथे ओशाळल्या वेदना या कांदबरीच्या प्रकाशन सोहळयाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना भोसले होत्या यावेळी उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, कवी रवि सोनार, आशा पाटील, प्रा.संजय घोगरदरे, निलेश डोंबे, सुधाकर कवडे, प्रा.राजेश कवडे उपस्थित होते.
आजवर महिलांची सोशिकता, सहनशिलता यावर मराठी साहित्यात खुप लिखान झाले त्यामुळे स्त्रिीचे सोशिक रुप समाजासमोर उभा राहिले मात्र येथे ओशाळल्या वेदना या कादंबरीतील नायिका सुमी हिने वरील सर्व गोष्टी सहन करुन परिस्थितीला तोंड देत आपले विद्रोही रुप दाखविले. त्यामुळे मराठी साहित्याला या कादंबरीने नवा अध्याय दिला आहे. पारंपारिक रुढी, परंपरा मध्ये न गुंतता नव्या उमेदीने जीवन जगण्याचा मुलमंत्र या कादंबरीतून मिळतो असे प्रा.रमेश शिंदे यांनी सांगीतले. तर महिलांचे समाजकारण, राजकारण, अर्थकारण या क्षेता्रमध्ये प्राबल्य वाढले आहे. मात्र ते साहित्यामध्ये प्रतिबिंबीत होणे गरजेचे होते ते काम लेखीका सौ. स्मिता कवडे यांनी इथे ओशाळल्या वेदना या कादंबरीतून केले आहे असे प्रतिपादन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले.
महिलांचा सामाजिक कार्यामध्ये वाढता सहभाग हेच त्यांच्या प्रगतीचे लक्षण असून या साहित्यकृतीमुळे महिलांच्या मध्ये जागृती निर्माण होवून प्रगल्भता वाढेल असा विश्वासू उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी रवि सोनार, आशा पाटील, सुधाकर कवडे यांनी आपले मनेागते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कु.वृषाली कवडे हिने केले तर आभार प्रतिक कवडे यांनी व्यक्त केले.

 

सौ.स्मित कवडे लिखित इथे ओशाळल्या वेदना कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी नगराध्यक्षा साधना भोसले, लेखिका स्मिता कवडे, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, आशा पाटील, प्रा.रमेश शिंदे, निलेश डोंबे, रवि सोनार, संजय घोगरदरे व इतर.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here