*आगामी सर्व निवडणूका कॉंग्रेस पक्ष ताकदीने लढविणार*

पंढरपुरात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या बैठकीत निर्धार
पंढरपूर-
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका या सर्व निवडणुका ताकतीने लढविण्यात येणार असून याबाबत पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस कमिटीचे सर्व सेलचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत आगामी निवडणूका ताकतीने लढविण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे.
महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने मोहन जोशी हे निरीक्षक म्हणून पंढरपूर येथे आले असता त्यांच्या उपस्थिती पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आगामी काळात कॉंग्रेस कार्यकर्त्याला ऊर्जा देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केलेल जाईल. कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी ग्वाही मोहन जोशी यांनी दिली.
या बैठकीस पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, मा. नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष संदीप शिंदे, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, सोशल मीडिया शहराध्यक्ष महेश अधटराव, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अण्णा उपाध्यक्ष मिलिंद आढळकर समाजसेवक शिवाजी धोत्रे, पांडुरंग इरकल, युवक उपाध्यक्ष रवी अग्रवाल , आकाश कदम यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here