|| झाडु संतांचे मार्ग || करु पंढरीचा स्वर्ग |पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान

स्वच्छ सर्वेक्षण 2026 माझी वसुंधरा 7.0

आषाढी यात्रा 2026 निमित्त पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना व भाविकांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने नम्र आवाहन

पंढरपूर भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे.

शहराचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वाचे आद्य कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणे करीता खालील सुचनांचे सर्वांनी पालन करुन पंढरपूर नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती.

1) राहण्याची व्यवस्था :-

यात्रेकरु, दिंडीकरी,फडकरी, भाविकभक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे. कोणत्याही धोकादायक इमारती मध्ये राहु नये.

2) उघड्यावरील अन्न टाळा :-

आपले आरोग्य बिघडू नये म्हणून उघड्यावरील व माश्या बसलेले अन्नपदार्थ, शिळे अन्न आणि नासकी फळे, कापलेली फळे खाणे टाळावे.

3) शुद्ध पाणी :-

नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या शुद्ध व पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये.

4) घनकचरा व्यवस्थापन :-

आपल्या मठ/संस्था, वास्तव करणाऱ्या ठिकाणी इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न इ. ओला, सुका असा वेगवेगळा साठवून ठेवावा तो नगरपालिकेची घंटा गाडी आल्यावर त्यामध्येच द्यावा.

शौचालयांचा वापर :-

नगरपरिषद प्रशासनाने ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या व कायमस्वरूपी शौचालयांचाच वापर करावा तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा. उघड्यावर शौचास बसू नये.

6) प्लॅस्टिकचा वापर टाळावा :-

पंढरपूर शहरात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. पंढरपूर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका. कृपया कापडी पिशव्यांचा वापर करावा.

7) प्रशासनाला सहकार्य करा :-

आपत्कालीन परिस्थितीत पोलीस आणि स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे.

8) वैद्यकीय मदत :-

कुठेही त्रास जाणवल्यास तात्काळ जवळच्या नगरपरिषद प्रथमोपचार केंद्र किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.

9) पार्कींग व्यवस्था ठिकाणे :-

अंबाबाई पटांगण, संत गजानन महाराज मठामागे, इसबावी विसावा मंदिर समोर, सांगोला रोड एम.एस.ई.बी.समोर, कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मरिआई पटांगण, कराड रोड वेअर हाऊस जवळ, रेल्वे स्टेशन मैदान, आहिल्या देवी चौक नविन पुलाजवळ, वाखरी पालखी तळ, कुर्डुवाडी रोड गणेश ढाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वरील सुचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. तरी सर्व भाविकांनी व नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे .

श्री.महेश रोकडे.

मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर

डॉ. सौ. प्रणिता भालके

नगराध्यक्षा, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर

श्री. महादेव धोत्रे उप-नगराध्यक्ष

पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here