उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६/ ११/२०२२रोजी स. ९ ते सायं.५वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पंढरपूर शहर पोलीस स्टेशन कार्यालय पंढरपूर येथे रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे
पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्यावतीने मुंबई येथे अतिरेकी व पोलिस अधिकारी यांच्या चकमकीमध्ये अतिरेकी दहशती हल्ल्यातील सर्व शहीद झालेल्या व पंढरपूरचे शहीद वीर पुत्र मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ सालाबाद प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूरची उपविभागीय वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
दिनांक २६/११ च्या मुंबई येथे अतिरेकी दहशती हल्ल्यातील शहीद झालेले पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी हेमंत करकरे ,शहीद अशोक कामटे ,शहीद विजय साळस्कर तर शहीद राहुल शिंदे, तुकाराम उंबासे हे पोलीस कर्मचारी दहशती हल्ल्यामध्ये शहीद झाले असून पंढरपूरचे वीर पुत्र जवान कुणाल गोसावी ही आपली सेवा बजावताना अतिरेकी यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत गोळीबारात शहीद झाले असून या सर्वांच्या स्मरणार्थ पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६/ ११/२०२२रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे ठिकाण पंढरपूर शहर पोलीस स्टेशन कार्यालय पंढरपूर येथे करण्यात आले असून याकरिता पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण फुगे, पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव ,पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू हे आपल्या सर्व कर्मचाऱ्यासह रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेत असून रक्तदान शिबिराचे हे ६वे वर्ष आहे ,तरी या भव्य रक्तदान शिबिरास पंढरपूर शहर व तालुक्यातील रक्तदान प्रेमी नी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Home Uncategorized *उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*