पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल कारखान्याकडे सभासद , ऊस वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांची देणी थकली आहेत. सभासदांनी ठामपणे पाठीशी उभे राहिल्यास , एक महिन्याच्या आंत ही देणी देऊ , विठ्ठल कारखान्याचा सुवर्णकाळही पुन्हा आणू ; असे मत युवराज पाटील यांनी शेवते येथील सभेत व्यक्त केले. बोलणं एक आणि करणं एक , या संस्कारातील आम्ही नाही असेही त्यांनी सभासदांना ठासुन सांगितले. यावेळी गणेश पाटील आणि शेवते गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.
विठ्ठलाच्या निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे .या निवडणुकीत सभासदांचे लक्ष लागून राहिलेल्या युवराज पाटील यांच्या गटाने प्रचारात आघाडी घेतली आहे. बुधवारी शेवते येथे त्यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी युवराज पाटील यांनी सभासदांना विश्वासात घेत पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
विठ्ठल कारखाना म्हटले की कै औदुंबर अण्णांच्या कार्याची आठवण सभासदांना होत राहते. सध्याची कारखान्याची दयनीय अवस्था पाहता, कै. औदुंबर आण्णांचा काळ परत यावा, अशी अपेक्षा सभासदांमधून व्यक्त होत आहे. यावर बोलताना युवराज पाटील म्हणाले की, सध्या विरोधकही आण्णांच्या नावाचा उल्लेख प्रचारात करत आहेत. आण्णांसारखे सारखे कार्य केले असते तर, कारखान्यावर ही वेळ आलीच नसती. विठ्ठलच्या सभासदांवर ही निवडणूक म्हणजे मोठी जबाबदारी आहे. कारखान्याला उर्जितावस्था कोण आणू शकेल याचा विचार सभासदांनी करावा, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये; सभासदांनी साथ दिल्यास एक महिन्याच्या आत सर्व थकीत देणी देण्याचे काम मी करतो, असे ठामपणे सांगून सभासदांनी पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह शेवते गावातील इतर प्रतिष्ठित मंडळींनीही आपले मत व्यक्त केले. युवराज पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार केला.
- चौकट
विठ्ठलच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. युवराज पाटील यांच्या गटाने प्रचारात मुसंडी मारली आहे. गाव बैठका घेत चाय पे चर्चाही सुरू आहेत. विठ्ठल कारखान्यास संकटातून कोण बाहेर काढू शकतो ? याचा शोध ऊस उत्पादक शेतकरी घेत असल्याचे चित्र सध्या या निवडणुकीत दिसत आहे.