अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “एक हात मदतीचा” या संकल्पनेतून सातारा,रायगड जिल्ह्यात १००० जीवनावश्यक कीटचे वाटप
पंढरपूर:-
“जे वाहून गेलं ते पुन्हा आणू शकत नाही. पण मोडलेला आणि पडलेला संसाराचा गाढा उभा करण्यास हातभार लावू शकतो”
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने थैमान घातल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने हजारो लोकांची घरं पाण्याखाली गेली. शेकडो जनावरं वाहून गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळून अनेकांचा बळी गेले. ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांच्यावर तर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. या संकटाच्या प्रसंगात या पूरग्रस्तांना “एक हात मदतीचा” त्यांना धीर देणं आणि त्यांचे उध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करणं हे माझ्या सहका-यांनी जबाबदारी म्हणून पंढरपूर तालुक्याचे नेते अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसानिमित्त या कीटमध्ये गहू, साखर, तांदूळ, डाळ, तेल, रवा, मसाला, तिखट, मीठ बॉटल, चहा पावडर, बिस्कीट पुडे, ब्रश, कोलगेट, साबण, मेणबत्ती यासह २१ जीवनावश्यक वस्तूंचे कीट सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात बाजे, मिरगाव, गोकुळ, ढोकावळे तर रायगड जिल्ह्यातील असनपोई, बौद्धवाडी, बिरवडी, भोरप या पूरग्रस्त गावातील नागरिकांना देण्यासाठी अभिजीत आबा पाटील फाऊंडेशन चे सहकारी रवाना झाले आहेत.
अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या अवाहनाला प्रत्येकाला जमेल तशी वस्तू ,अन्न धान्याची मदत केली. आपल्याकडं किती आहे यांचा विचार न करता सहका-यांनी केलेली ही मदत मनाला खूपच भावली. मला वाटतं घासातला घास काढून देणारी माणसांसोबत काम करताना मला ऊर्जा मिळत असून त्यांची ही दानत पाहून अधिक काम करण्याची प्रेरणाही मिळाली. याच माणसांच्या बळावर आपण कोणत्याही संकटाला धाडसाने सामोरं जाऊ शकतो असं अभिजीत पाटील यांनी मत व्यक्त केले.