प्रतिनिधी:-
मा. ना. नितीनजी गडकरी साहेब यांच्या सन्माननीय उपस्थितीत भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे यांच्या प्रचारार्थ विराट जनसभेचे आयोजन आठवडा बाजार, शिवप्रेमी चौक, मंगळवेढा येथे करण्यात आले होते. यावेळी मा. आमदार प्रशांतजी परिचारक मालक यांच्या उपस्थितीत मा. गडकरी साहेबांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले.
ही निवडणूक उमेदवारांचं भविष्य ठरवणारी नाही तर जनतेचं भविष्य ठरवणारी आहे, महायुती सरकारच्या काळात पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सर्वच क्षेत्रांत विकासकामे झाली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारसंघातील जनतेपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवण्याचे काम होत आहे. या मतदारसंघातील जनता विकासाला प्राधान्य देऊन पुन्हा एकदा समाधान महादेव आवताडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करेल, असा विश्वास यावेळी मा. ना. नितीनजी गडकरी यांनी संवाद साधताना व्यक्त केला.
याचबरोबर आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन महायुतीच्या मागे सक्षमपणे उभं राहिलं तरच आपल्याला अजून मोठ्या विकासाचा पल्ला गाठता येईल. आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास हाच प्रामाणिक ध्यास समोर ठेऊन संपूर्ण मतदारसंघातील जनतेने महायुतीसोबत उभे राहून हा विकासाचा प्रवास अधिक मजबूत केला पाहिजे, हे विनम्र आवाहन करून समाधानदादांनी प्रचंड जनसमुदायासोबत संवाद साधला.
सदर प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. भास्कर दादा कसगावडे, मंगळवेढा भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अंबादास कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. सुदर्शन यादव, रयत क्रांती संघटनेचे श्री. दीपक भोसले, माजी नगरसेवक श्री. अजित आप्पा जगताप, माजी सभापती श्री. सुधाकर मासाळ,शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.महेशनाना साठे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस श्री. शशिकांत नाना चव्हाण, श्री. संतोष पवार, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. माऊली हाळणवर, भाजपा विधानसभा संयोजक श्री. तानाजी काकडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. प्रदीप खांडेकर, माजी नगरसेवक श्री. प्रवीण खवतोडे, श्री. नागेश डोंगरे, माजी नगरसेवक श्री. विक्रम शिरसट, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. अशोक चौंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. सोमनाथ आवताडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉ.प्राजक्ता बेणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री. श्रीकांत शिंदे, श्री. प्रकाश गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. बापुराया सावकार चौगुले, माजी उपसभापती श्री. विजयसिंह दादा देशमुख, माजी संचालक श्री. द्रोणाचार्य हाके, माजी नगरसेवक श्री. सुनिल डोंबे, सौ वर्षाताई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष श्री. रामेश्वर मासाळ, भाजपा विधानसभा अध्यक्ष श्री. राजेंद्र सुरवसे, जेष्ठ नेते श्री. लतीफभाई तांबोळी, श्री. आप्पासाहेब पट्टणशेट्टी, श्री. सुर्यकांत ठेंगील, श्री. मुज्जमिल काझी, श्री. सुरेश जोशी, श्री. दत्तात्रय जमदाडे, श्री. औंदुंबर वाडदेकर, श्री. ज्ञानेश्वर भगरे आदी मान्यवरांसह भाजप महायुती व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, विविध गावातील सरपंच पदाधिकारी व मतदारसंघातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.