मी सर्व सामान्य जनतेचा उमेदवार असुन मला मतदान रुपी आशिर्वाद देऊन विजयी करतील
पंढरपूर :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज स्वतः व त्यांच्या पत्नी सौ माधुरी धोत्रे असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ते म्हणाले की मी सर्व सामान्य जनतेचा उमेदवार असुन मला मतदान रुपी आशिर्वाद देऊन विजयी विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केली.गेल्या अनेक दिवसां
पासून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी व सर्व सामान्य जनतेच्या सातत्याने संपर्कात आहेत विविध गाव भेट दौरा, घोंगडी बैठक,गाव सभा घेऊन आपली भूमिका मांडली आहे. राजकारण न करता समाजकारण करित शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा युवती, सर्व सामान्य नागरिक यांच्यासाठी काय काय केले आहे ते त्यांनी सांगितले आहे.आज उमेदवारी दाखल करता त्यांनी शक्तिप्रदर्शन केले नाही साध्या सरळ पद्धतीने अर्ज दाखल केला आहे.व आपण सर्व सामान्य जनतेचा उमेदवार असुन त्यांच्यासाठी मी सदैव तत्पर राहिन व जनतेचा विश्वास पात्र काम करेन असे प्रतिपादन त्यांनी केले.