DVPपिपल्स मल्टीस्टेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल- अभिजीत पाटील

दि पिपल्स मल्टीस्टेट, शाखेचे मोहोळ येथे उदघाटन संपन्न

प्रतिनिधी पंढरपूर:-
DVPउद्योग समूहाचे व धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून DVP उद्योग समूहाची झेप ही सहकार क्षेत्रात कार्यरत असून आता अर्थकारणात पाऊल टाकत आज मोहोळ येथे श्री नागनाथाच्या पावन नगरीत दि पिपल्स मल्टीस्टेट या नवीन शाखेचे उद्घाटन नागनाथ महाराजाचे प.पु.राजेंद्र खर्गे महाराज, मोहोळचे मा. आमदार श्री.राजन मालक पाटील, मा.जि.प.उपाध्यक्ष श्री.दिपक गायकवाड, श्री.पद्माकर आप्पा देशमुख, मा.उपसभापती श्री.बाळासाहेब गायकवाड, प्रथम नगराध्यक्ष श्री.रमेश बारसकर, नगरसेविका सौ. सिमाताई पाटील, लोकसेवक श्री.संजय शिरसागर, पोलीस निरीक्षक श्री.अशोक सायकर, नगराध्यक्ष श्री.शौकीन तलफदार, उपनगराध्यक्ष श्री.प्रमोद बापू डोके,भाजपा तालुकाध्यक्ष श्री.सतीश काळे, श्री.प्रवीण डोके आदीच्या शुभहस्ते करण्यात आले.

बँकेच्या माध्यमातून अधिक तरूणांना रोजगार व उद्योग उभारणीस मदत होईल. नागरिकांचे हित समोर ठेवून विविध योजना राबवण्यात येतील. ऑनलाईन बॅकींग हि सुरू ठेवण्यात आले आहे. बँकेचा ठेवीचा व्याजदर हा अधिक असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी ठेवी द्याव्या यामुळे मोहोळ नगरी व आजूबाजूच्या गावांचे अर्थकारण नक्कीच सुधारणीत हातभार लागेल असे धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमनश्री.अभिजीत पाटील म्हणाले.

याप्रसंगी धाराशिव साखर  कारखान्याचे संचालक श्री. रणजीत भोसले, श्री. संदीप खारे, श्री. सुहास शिंदे, श्री. आबासाहेब खारे, श्री. दीपक आदमिले, श्री. दिनेश शिळ्ळे, श्री. जंयत सलगर, मल्टीस्टेटचे चेअरमन श्री. संदेश दोषी, श्री. सुरज पाटील, श्री. श्रीनिवास बोरगावकर, श्री. सचिन खरतडे, श्री. महेश जावळे, श्री. कुलदीप कौलगे, तसेच मोहोळ मित्र परिवार उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here