स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य शिबीर

पंढरपूर /प्रतिनिधी

पंढरपूरचे माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर आरोग्य शिबीराचे आयोजन केले असल्याची माहिती युवक नेते प्रणव परिचारक यांनी दिली .
या
आरोग्य शिबीराची सुरूवात 11 ऑगस्टपासून झाली असून हे शिबीर 23 ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहेत . यामध्ये मोफत नेञतपासणी व मोतीबिंदु शस्ञक्रिया तसेच महिलांसाठी कर्करोग तपासणी केली जाणार असल्याची माहिती शिबीराचे आयोजक राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती सोलापूर व पांडुरंग परिवार युवक आघाडी तसेच प्रणव परिचारक युवा मंचच्यावतीने सांगण्यात आले . या शिबीरास नागरिकाचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य शिबीर भाळवणी आरोग्य केंद्र येथे संपन्न झाले. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे, शिवसेना पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here