राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांचे दिले निवेदन

 

 

पंढरपूर  – महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका महानगरपालिका मधील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या असलेले  निवेदन आमदार समाधान दादा अवताडे यांनी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मुंबई येथे दिले. सोबत जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक  होते. राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका सफाई कामगारांच्या मागण्या साठी पंढरपूर येथे सोमवार दि.९/८/२०२१ एक दिवसाचे काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्या ठीकानी संघटेनेचे पदाधिकारी व सफाई कामगार उपस्थित होते. आमदार समाधान दादा आवताडे यांनी त्या ठिकाणी भेट दिली. व त्यांच्या बरोबर त्यांच्या मागण्या बद्दल चर्चा केली. आणी त्यांना आश्वासित केले की या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी मांडून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आणी बुधवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना दिले.या अगोदर नगरपालिका व महानगरपालिका सफाई कामगारांच्या बाबतच्या मागण्यांसाठी वेळोवेळी काही लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी निवेदनाद्वारे मागणी केली होती परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही असे समजते परंतु विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना निवेदनाद्वारे सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी निवेदन दिले .त्यामुळे राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका मधील  सफाई कामगार संघटना मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here