*बबनराव आवताडे सिद्धेश्वर अवताडे यांचा भगिरथ भालकेनां दिले पाठिंबा*

प्रतिनिधी:–
महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांना मंगळवेढा तालुक्याचे जाणता नेता म्हणून मतदार संघात परिचित असणारे बबनराव आवताडे व युवा नेते सिद्धेश्वर आवताडे यांचा जाहीर पाठिंबा व संपूर्ण समर्थन त्यांनी दिले आहे यामुळे आवाडे यांची ताकत भालके यांना मिळणार आहे तर मंगळवेढा तालुक्यात बबनराव आवताडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार भालके यांना होणार आहे.

यावेळी युवा नेते सिद्धेश्वर आवताडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, गेली काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडी घडल्यानंतर आम्ही आमच्या निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद करुन संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच मंगळवेढा तालुक्यातील स्वाभिमानी जनता आमच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.त्यामळे येणाऱ्या विधानसभेत भगिरथ भालके हेच विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके,तसेच बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे व त्यांचे सहकारी मित्र परिवार, युवा वर्ग, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here