*समृद्धी ट्रॅक्टरमधून गणेश आगमनाला एकाच वेळी २१ जणांनी खरेदी केला सोनालिका ट्रॅक्टर*

तिघांना मिळाला लकी ड्रॉ विजेत्याचा मान;भव्य रॅली काढून लकी ड्रॉचे वितरण

पंढरपूर प्रतिनिधी/-

श्रीगणेश आगमनाच्या दिवशीच गणपती बाप्पांच्यासोबतच पंढरपूर तालुक्यातील डिव्हीपी उद्योग समूह समृद्धी ट्रॅक्टर्समधून तब्बल २१ शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २१ सोनलिका ट्रॅक्टर्सची खरेदी केली. त्यामुळे भव्य रॅली काढून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्यात आले. तसेच प्रत्येकी दहा ग्राहकांचा लकी ड्रॉ घेण्यात आला होता. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम व सवलती राबविणाऱ्या समृद्धी ट्रॅक्टर्सच्यावतीने यावेळी लकी ड्रॉ काढून तीन भाग्यवान विजेत्यांना धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या हस्ते प्रथम विजेते श्री.महेश बळीराम कोरके या क्रमांकासाठी २१००० रुपये,द्वितीय विजेते श्री.मारूती दादासो  भोसे क्रमांकासाठी १५००० व तिसरे विजेते श्री.रणजीत नंदकुमार बागल या क्रमांकाच्या विजेत्याला ७००० रुपयांचा धनादेश देण्यात आला.पंढरपूर तालुक्यातील समृद्धी ट्रॅक्टर्स ही सोनलिका ट्रॅक्टर्सची राज्यातील प्रमुख शाखा असून देशात द्वितीय क्रमांकाच्या व राज्यात प्रथम क्रमांकाचा विक्रीचा मान सध्या समृद्धी ट्रॅक्टरने मानांकन मिळवले आहे.

पंढरपूरचे युवा नेते व धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्सच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.काल बाप्पांच्या आगमनाला २१ शेतकऱ्यांनी सोनलिका ट्रॅक्टर खरेदी करून सोनलिकाला आपली पसंती असल्याचे दाखवून दिले आहे.त्यामधून शेतकरी सुखी समृद्धीमय व्हावा त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण उचावेल. तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासत अभिजीत पाटील  यांनी शेतकऱ्यांशी आपुलकीचे नाते केले असल्याने दिसून येते. त्याच बरोबर लकी ड्रॉची सवलत ही एक महीना वाढविण्यात आल्याने अजून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी ग्राहक, शेतकऱ्यांसह सोनालिका ट्रॅक्टरचे साहील शिंगला सर, सुरेंद्रसिंग ठाकूर सर, समृद्धी ट्रॅक्टर्सचे अभिजीत कदम, मॅनेजर सोमनाथ केसकर, पोरेदादा, समृद्धी ट्रॅक्टर्स सेल्समन टिम आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here