सोलापूरमध्ये पोलीस मित्राच्या पत्नीवर दुष्कर्म करणारा पोलीस शिपाई अखेर निलंबित

सोलापूर – पोलीस मित्राच्या पत्नीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाला निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले.संशयित आरोपी रवी मल्लिकार्जुन भालेकर असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे.फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भालेकर हा शिपाईपदावर कार्यरत होता. तत्पूर्वी, त्याने शहर वाहतूक शाखेतही काम केले आहे. त्याचा मित्र शहर पोलीस दलात असून तो सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने पोलीस मुख्यालयातील रूग्णालयात उपचार घेत होता. ही संधी साधून भालेकर हा त्या मित्राच्या घरी पोहोचला.

      मित्राची पत्नी घरात एकटीच होती.घरात गेल्यानंतर त्याने आतून कडी लावून घेतली. त्यावेळी त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस, असे म्हणून तिच्यावर दुष्कर्म केले होते. त्यानंतर त्या पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. भालेकर याला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी तळे या करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here