*सभासदांच्या मनामनापर्यंत पोहोचा , विजय खेचून आणा – ॲड. दीपक पवार*

पंढरपूर (प्रतिनिधी)

विठ्ठल कारखान्याची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचारासाठी एकच दिवस बाकी आहे. हा दिवसही वाया न घालवता सभासदांच्या मनामनापर्यंत पोहोचा, आणि श्री विठ्ठल आण्णाभाऊ विकास पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन ॲड. दीपक पवार यांनी सभासद कार्यकर्त्यांना केले. ते करकंब येथील प्रचारसभेत बोलत होते यावेळी युवराज पाटील , गणेश पाटील, रायप्पा हळनवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विठ्ठल कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. रविवार प्रचाराचा शेवटचा दिवस होता. युवराज पाटील यांच्यासह ॲड. दीपक पवार आणि गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल आण्णाभाऊ विकास पॅनल, हा निवडणुकीत उतरला आहे. सुरुवातीपासूनच या गटाने प्रचारात आघाडी घेतली आहे. शिस्तबद्ध प्रचार सुरू असताना शेवटच्या दिवशीही प्रचारात मुसंडी मारा, सभासदांच्या घरापर्यंत तसेच मनामनापर्यंत पोहोचा, आणि , अण्णाभाऊ विकास पॅनलचा जोर ६ तारखेला सर्वांनाच दिसू द्या , असे आवाहन ॲड. दीपक पवार यांनी या प्रचार सभेत केले.

विरोधी दोन्ही पॅनल सभासदांची दिशाभूल करू पहात आहेत. स्व. औदुंबर अण्णांच्या काळातील विठ्ठल कारखाना पुन्हा सभासदांसमोर साकारायचा आहे . हे काम खात्रीपूर्वक हा पॅनल करेल, असा विश्वास देऊन सभासदांनी युवराज पाटील यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन ॲड. दीपक पवार यांनी यावेळी केले.

करकंब येथील प्रचार सभेस सभासदांनी मोठी गर्दी केली होती. या सभासदांना दीपक पवार यांनी संबोधित केले. यावेळी युवराज पाटील गणेश पाटील यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले.

चौकट

मंगळवार दि.५ जुलै रोजी विठ्ठल कारखान्याची निवडणूक पार पडत आहे. शुक्रवारी सायंकाळी करकंब येथील प्रचार सभेत, ॲड. दीपक पवार यांनी सभासदांसह, कार्यकर्त्यांनाही मार्गदर्शन केले. शेवटचे दोन दिवस अजिबात थांबू नका, सभासदांच्या घरापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचा, आणि ६ तारखेला विजयाचा गुलाल खेळण्यासाठी सज्ज रहा , असे आवाहन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here