पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक लाल रंगाच्या मालवाहतुक ट्रकमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा पंढरपुर मार्गे टेंभुर्णीकडे जात असल्याची गोपनीय बातमी मिळालेने पंढरपुर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हददीतील अहिल्या पुलाकडे जाणारे रस्त्यावर सापळा रचला. बातमीतील वर्णनाचा मालवाहतुक ट्रक हा रिलायन्स पंपाजवळ आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवुन ट्रक चालकाकडे मालट्रक मधील मालाबाबत विचारणा केली असता ट्रक चालकाने गाडीमध्ये प्रतिबंधीत असलेला हिरा पान मसाला व सुगंधित तंबाखु असलेचे सांगीतलेने सदरचा माल ट्रक नं एम. एच- ०९ सी. ए ३६३० व त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित व विक्रीस मनाई असलेला गुटखा तसेच मालट्रक चे चालकास ताब्यात घेवुन सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणेस आणुन अन्न व औषध प्रशासन यांचेशी संपर्क करून पुढील कार्यवाही करीत आहे.
जप्त करणेत मालट्रक व प्रतिबंधीत केलेला गुटखा एकुण मुद्देमाल खालीलप्रमाणे,
१) २७,६०,००० /- रु. किंमत अंदाजे हिरा कंपनीचा पान मसाला :- १२० पोती २) ६,९०,००० /- रु. किंमत अंदाजे रॉयल ७१७ कंपनीची तंबाखु – ३० पोती ३)१०,००,०००/- रु किं एक अशोक लेलंड कंपनीचा ट्रक नं एम.एच- ०९ सी. ए ३६३०
एकुण ४४,५०,०००/- किंमतीचा मुददेमाल चालकासह ताब्यात घेतला. सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिमंतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, श्री. विक्रम कदम सो व श्री. अरुण पवार सो, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनि सी. व्ही केंद्रे, पोसई / दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ / १०६३ ढेरे, पोहेकॉ / ३९६ सुरज हेंबाडे, पोहेकॉ / ४१९ शरद कदम, पोना / १७३६ सचिन इंगळे, पोना / ४८४ सुनिल बनसोडे, पोना / १६५७ दादा माने, पोना / ५६२ राकेश लोहार, पोना / १७८९ सचिन हॅबाडे, पोना / १२२८ सुजित जाधव, पोकों / २१९० समाधान माने
यांनी केली आहे.