*
*सिने अभिनेत्री स्पृशा जोशीची राहणार प्रमुख उपस्थिती*
विठ्ठल परिवाराचे नेते आणि विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकलपनेतून तालुक्यातील विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या रविवार दिं 2ऑक्टोबर रोजी पंढरीत भव्य गरबा दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दांडिया गरबा येथील श्री संत तनपूरे महाराज मठ येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहेत. या कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री स्पृषा जोशी उपस्थित राहणार आहेत. यामधे विजेत्या स्पर्धकाना आकर्षक कौटुंबिक वस्तूचे वाटप करण्यात आले असल्याचे संयोजक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
या स्पर्धेत बेस्ट दांडिया नाईट कपल साठी बक्षीस म्हणून स्कूटी पेप , बेस्ट दांडिया साठी फ्रिज, बेस्ट दांडिया गरबा साठी टि.व्ही, बेस्ट दांडिया पुरुष साठी आटा चक्की, बेस्ट ड्रेसिंग साठी ओव्हन, बेस्ट दांडिया लहान मुला मुलीसाठी दोन सायकल आशा प्रकारे वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वय वर्ष पाच ते पन्नास वयाची अट राहणार आहे. स्पर्धेत महिला आणि कपल साठी मोफत प्रवेश असून सिंगल साठी प्रवेश फी 300रुपये ठेवण्यात आली आहे. तरी ज्यांना सहभाग नोदवायचा असेल त्यांनी 9595020020आणि 7822969629या मोबाइल नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने कळविण्यात आले आहे.