सर्वात जास्त दर देण्याची कै.औदुंबर आण्णा पाटील यांची परंपरा चालू ठेवणार “चेअरमन अभिजीत पाटील

पंढरपूर (प्रतिनिधी) :-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नुकतीच 49 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या प्रसंगी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी यांना संबोधन करत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा कै.औदुंबर अण्णा पाटील यांनी सुरू केली होती. ही परंपरा कायम चालू ठेवण्याच्या उद्देशाने शेतकरी ऊस उत्पादक सभासदांना जास्तीचा दर मिळवून देण्याच्या उद्देशाने 3500 चा दर ऊसाला देण्याचे त्यांनी जाहीर केलेले असून अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीचा भाव मिळावा, त्याचप्रमाणे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद हे आर्थिक बाबतीत सक्षम व्हावेत या भूमिकेतून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला 3500 चा दर देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपयाचा दर जाहीर केल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये सहकारी क्षेत्रातील सर्व साखर कारखाना मध्ये एकच खळबळ उडाली आहे. एवढा जास्तीचा दर देणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा एकमेव कारखाना असून या कारखान्याच्या कार्य शैलीला व कारखान्याच्या कारभाराला संपूर्ण राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने 3500 चा दर जाहीर केल्यानंतर अन्य साखर कारखान्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 3500 दराच्या पेक्षाही एक रुपया जास्तीचा दर देऊ म्हणणारे साखर कारखानदार यांना अभिजीत आबा पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे. की तुम्ही जर का तीन हजार पाचशेच्या वर एक रुपया जास्त देत असाल तर मी दोन रुपये जास्तीचा दर दिल्याशिवाय राहणार नाही. या जास्तीच्या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकरी सुखी समाधानी तर संपूर्ण राज्य सुखी व समाधानी असणार आहे. असे त्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 49 व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संपूर्ण संचालक मंडळ त्याचप्रमाणे हजारोच्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी हे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here