*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते कृषी महोत्सव चे उद्घाटन समारंभ*

पंढरपूर ( प्रतिनिधी ) :–

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कृषी पंढरी वर्षं 10 वे .माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित ” कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सव 2025 या कृषी महोत्सव चे भव्य उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमांचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कृषी महोत्सव उद्घाटन शनिवार दिनांक 5जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.तरी महाराष्ट्र राज्यातून व परराज्यातील भाविक भक्त व शेतकरी बांधव कृषी महोत्सव ला उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी बांधवांना शेती विषयक नवीन तंत्रज्ञानाचा तसेच आधुनिक औजारे यांची माहिती व प्रात्यक्षिक पहाण्याचा लाभ होणार आहे.आषाढी यात्रेला शेतकरी कष्टकरी बांधव येत असतात.त्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याची माहिती या कृषी महोत्सवात मिळणार आहे.शेतीतील उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान या विषयीची माहिती दिली जाणार आहे.तरी कृषी महोत्सव ला शेतकरी बांधवांनी भेट द्यावी.असे निमंत्रण पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती हरिष दादा भास्करराव गायकवाड व उपसभापती राजूबापू विठ्ठलराव गावडे दिले आहे.

गेली दहा वर्षे झाली या कृषी महोत्सवाला प्रचंड प्रमाणात शेतकरी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे.आमदार प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कृषी महोत्सवात अनेक शेती विषयक तंत्रज्ञान व मार्गदर्शन तज्ञ लोकांचे कडून केले जाणार आहे.सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी भेट द्यावी
असे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here