पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी मी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी द्या
पंढरपूर:-
महिलांना आपले कौशल्य, कलागुणांना, हक्काचं व्यासपीठ मिळालं यासाठी अनिल सावंत यांच्याकडून दिनांक 26/9/2024 वेळ 2 वाजता, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्थळ दाते मंगल कार्यलय, सांगोला रोड पंढरपूर,
अनिल सावंत यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला 4 हजार महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडून उपस्थित प्रत्येक महिलेस साडीचे वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून, भैरवनाथ शुगरचे मॅनेजमेंट डायरेक्टर शिंदे साहेब, शेती अधिकारी रमेश पवार कृष्णदेव लोंढे, एचआर मॅनेजर राठोड, अशोक निकम इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.
भाषण- कार्यक्रमात बोलताना अनिल सावंत यांच्याकडून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. मतदारसंघात कुठल्याही महिलेला काहीही अडचण आली, तरी मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. कुठल्याही महिलेला स्वयंरोजगार, व्यवसाय उभा करायचा असेल, तर भाऊ म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी असेल. आमचा घराणा हा माळकरी आहे. मी स्वतः माळकरी आहे. त्यामुळे लोकांच्या भावना तत्परतेने समजू शकतो. पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार, तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न, शहरातील अंतर्गत रस्ते, स्वच्छ्ता, या सगळ्या समस्या मी सोडवेल. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण रोजगार मेळाव्याचे आयोजन करतोय.पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी मी विकासाचे एक स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची मला संधी द्या. अशा भावना व्यक्त करताना विधानसभा निवडणुकीत संधी देण्याचे आवाहनही अनिल सावंत यांच्याकडून उपस्थित महिलांना करण्यात आले.
कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांशी संवाद
साधण्यात आला. यामध्ये काही महिलांनी अनिल सावत यांच्या नावाचे उखाणे देखील घेतले. महिला म्हणाल्या, कार्यक्रम खूप छान होता. दादा आमदार होताना बघायला खूप आवडेल. दादा आमदार झाल्यास आम्हाला आमचा भाऊ आमदार झाल्यासारखे वाटेल.
या कार्यक्रमात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कपाळावर बिस्कीट ठेवून खाणे, तळ्यात मळ्यात, डान्स रॅम्प वॉक, इत्यादी खेळाचे आयोजन केले होते.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण
१) पूजा शिंदे, पंढरपूर यांना रॅम्प वॉक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. पहिले बक्षीस म्हणून त्यांना led tv देण्यात आली.
२) अमृता शिंदे, पंढरपूर, दोरी उडी या स्पर्धेत जिंकल्याने शिलाई मशीन देण्यात आली.
3) रेश्मा साळुंखे पंढरपूर, तळ्यात मळ्यात या स्पर्धेमध्ये जिंकल्याने त्यांना तिसरे बक्षीस म्हणून वॉशिंग मशीन देण्यात आले.
४) सपना साळुंखे, मंगळवेढा यांचा तळ्यात मळ्यात या खेळत चौथा क्रमांक आल्याने त्यांना बक्षीस म्हणून पिठाची चक्की देण्यात आली.
५) पाचवा क्रमांक, निकिता साठे, बोहाळी, कच्चा पापड पक्का पापड, बक्षीस फ्रीज
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण अनिल सावंत आणि पत्नी शैलजा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळभोर यांनी केले.