पंढरपूर प्रतिनिधी: –
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या 39व्या वाढदिवसा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य कुस्ती स्पर्धा,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महा आरोग्य शिबीर, गोरगरीब जनतेसाठी डोळे तपासणी शिबिर, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
अभिजीत आबा यांनी आपल्या कुशल नियोजन आणि विकासाच्या दूरदृष्टीने
हजारो युवकांना रोजगानिर्मिती करुन त्यांना स्वावलंबी बनविले आहे.
आज संपूर्ण राज्यात सहा साखर कारखाने यशस्वी पणे चालवून सहकारातील एक उत्तम आदर्ष दिला आहे.
पंढरपूर येथे डी व्हि पी उद्योग समूह आलिशान मल्टीप्लेक्स थिएटर उभे करुन पंढरीच्या वैभवात भर टाकली, नव्या युगाला साजेसे मॉलयुग आणले,
कोरोना काळात स्वखर्चाने हॉस्पिटल उभे करुन हजारो रुग्णांचे प्राण वाचविले, हॉस्पिटलना ऑक्सिजन सिलिंडर तयार करून पुरविले . युवापिढी चे आयडॉल, म्हणुन पंढरपूर तालुक्यांत त्यांची ख्याती आहे.
जनतेच्या मनातील भावी आमदार म्हणुन लोक त्यांना मान देत आहेत.