*जनसामान्यांचा आधारवड….. अभिजित आबा पाटील*

*अभिष्टचिंतन विशेष*
माणसाच्या एकूण जीवनप्रवासात त्याच्या हातून घडणाऱ्या चांगल्या कार्याची गोळा बेरीज ही त्या माणसाच्या आयुष्याची किंमत असते. अशा माणसाची सुरुवात कुठून झाली हे महत्वाचे नसते. तर तो कुठे पोहोचला हे महत्वाचे असते.

एका साखर कारखान्यावर ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा मालक, हा पुढे जाऊन त्याच साखर कारखान्याचा लोकनियुक्त चेअरमन होऊ शकतो. हे अविश्वसनीय आणि दुर्मिळ उदाहरण म्हणजे अभिजित आबा पाटील होत.

सुमारे आठ दशकांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीत आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील हे एकमेव उदाहरण असेल. अवघ्या चाळीशीत असलेले हे नेतृत्व सोलापूर जिल्ह्यातील युवकांचे आकर्षण बनले आहे. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात सक्षम नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी अभिजीत आबा पाटील यांच्या रुपाने भरुन निघाली आहे. आणि हे सत्य तीन वर्षांपूर्वी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या, साखर कारखान्याच्या निवडणूकीतून तसेच लोकसभा निवडणुकीतही अधोरेखित झाले आहे. काय आहे आणि काय असावे याचे मर्म कळालेला युवा नेता अभिजीत आबा पंढरपूर मंगळवेढा या तालुक्यांचे नंदनवन करणार याची खात्री आता समाजमनाला पटली आहे. साखर कारखानदारीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारा महाराष्ट्रातील एकमेव तरुण चेअरमन

म्हणजे अभिजीत पाटील आहेत, असे गौरवोदगार देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी काढले होते. आपल्या कतृत्वाचा ठसा लहानवयातच उमटविण्यात यशस्वी झाल्यामुळे अभिजीत आबांना कारखाना चालवणारा माणूस, ऑक्सीजन मॅन, महाराष्ट्राचा महाब्रेड, भावी आमदार अशा बिरुदावल्या मिळाल्या आहेत. जे दुर्मिळ आहे ते मिळवायचं, जे मिळालेलं आहे ते सुरक्षित ठेवायचं, जे सुरक्षित ठेवण्याजोगे आहे ते वृध्दींगत करायचे आणि जे वृध्दींगत केले आहे त्याचा योग्य ठिकाणी वापर करायचा ही त्यांच्या विचाराची मूस आहे. आज तालुक्यातील जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेला नेता म्हणून अभिजीत आबांकडे पाहिले जाते.

चला उद्योजक घडवू या, अशा अभियानातून अभिजीत आबा युवकांचे प्रबोधन करतात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक युवा संग्रह असलेला नेता म्हणून अभिजीत पाटील नावारुपास आलेले आहेत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, या न्यायाने अभिजीत आबा अनेक क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत. व्यवसाय करताना केवळ पैश्याचाच विचार करायचा नसतो तर सामाजिक बांधिलकीचे भान आणि लोककल्याणाची तळमळ आवश्यक असते. हा विचार घेऊन काम करणाऱ्या अभिजीत आबांची समाजातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचण्याची हातोटी, सचोटी आणि कसोटी खरोखरच कौतुकास्पद आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here