*पुढील चार महिन्यानंतर मीच आमदार होणार* – *अभिजीत पाटील*

*पंढरपुरात ४०सह भला मोठा हार व हजारोच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी गर्दी करून अभिजीत पाटलांचा केला वाढदिवस*

*शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे* – अभिजीत पाटील

(वाढदिवसानिमित्त माढा व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला)

प्रतिनिधी पंढरपूर/-

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत जल्लोषपूर्ण व थाटामाटात वाढदिवस साजरा केला असून यामध्ये त्यांनी दिवसभराच्या भेटीगाठी नंतर, पंढरपूर येथील आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी सर्व समर्थक व कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला.

विधान भवनाचे छायाचित्र असलेला फलक व मोठा केक कापून अभिजीत आबा पाटील व त्यांच्या सर्व कारखान्याच्या संचालक व सर्व समर्थकांनी मिळून वाढदिवस साजरा केला यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मोठी मदत झाल्यामुळे, सर्व आमच्या विठ्ठल परिवारातील समर्थकांना व कार्यकर्त्यांना ऊर्जितावस्था प्राप्त झाली असून, यामुळे कारखान्याच्या तर प्रश्न सुटणार आहेतच पण येत्या दोन महिन्यांमध्ये आपण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहायचे असल्याचे यावेळी अभिजीत पाटील यांनी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की माढा मतदारसंघात त्यांच्या त्यांच्यात उमेदवारी ठरत नसून तिकडे तर विरोधकाला उमेदवारी मिळते का? नाही? असे चित्र निर्माण झाले आहे. पण माढा का पंढरपूर मंगळवेढा दोन्ही मतदारसंघाचा निर्णय हा ऐनवेळी घेतला जाणार असून आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांनी दोन्ही मतदारसंघात तयारी लागावे. दोन महिन्यात आपल्याला रन खेळायचे असून त्यामुळे आत्तापासूनच त्या रणाची तयारी आपल्याला करायची आहे. इतक्या दिवस आम्हाला हिणवले गेले की पोरा पोरांची पार्टी असून यांना कोणी गांभीर्याने घेऊ नका असे म्हणत असताना आम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून आपण सर्वांनी साथ द्यावी. यासाठी आपण सर्वांनी मदत करणार का? असे अभिजीत पाटील यांनी विचारलं तर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांमधून मोठ्या आवाजात होकार आल्यामुळे अभिजीत आबा पाटील व त्यांच्या सर्व समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला!

एकंदरीत माढा मतदारसंघाला जोडली गेलेली पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे व त्यांचे स्वतःचे गाव असणारे देगाव हे माढा मतदारसंघात असल्यामुळे व विठ्ठल सहकारी साखर कारखाना ही माढा मतदारसंघात असल्यामुळे या मतदारसंघातही मोठी ताकद अभिजीत आबा पाटील यांच्या असून काही माढा तालुक्यातील प्रतिष्ठित नेते मंडळींनी ही अभिजीत आबा पाटील यांची भेट घेऊन आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी मागणी केली असल्याचे खात्रीला वृत्त असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघापेक्षा तुम्हाला कधीही माढा मतदारसंघ सुरक्षित असून या मतदारसंघातून आपण निश्चितच विधान भवनात जाणार आहे. सांगितले आहे त्यामुळे आगामी दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवेढा किंवा माढा मतदारसंघातून असा जरी प्रश्न असला व कोणत्या पक्षातून हे जरी कार्यकर्त्यांना बुचकात टाकणारा प्रश्न असला तरी सुद्धा अभिजीत आबा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले असल्याचे या कालच्या कार्यक्रमावरून दिसत आहे.

*या वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिजीत आबा पाटील यांना देण्यासाठी विशेषता केज विधानसभा मतदारसंघाचे मा.आमदार, पृथ्वीराज शिवाजी साथे व व अभिजीत आबा पाटील यांचे सासरे मा. जि प सदस्य सुरेश तात्या पाटील, याचबरोबर पंढरपूर -मंगळवेढा सांगोला मोहोळ व माढा विधानसभा मतदारसंघावर प्रभाव असणाऱ्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी अभिजीत आबा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच मोठी गर्दी केली होती यामुळे या वाढदिवसाला यात्रेचे स्वरूप आले होते.त्यामुळे पंढरपूर पुणे रोड वरील दोन्हीकडची वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती.*

 

*पंढरपूर-मंगळवेढा व माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विखुरल्या गेलेल्या विठ्ठल परिवाराचे नेते असलेली चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून झालेल्या* *कार्यक्रमांमध्ये अभिजीत पाटील यांनी अनपेक्षित पणे आपल्या भाषणातून फटकेबाजी केल्यामुळे अभिजीत पाटील यांच्या विरोधकांमध्ये* , *आज सकाळपासून मोठी चर्चा रंगली आहे फक्त माढा विधानसभा का पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला असून लवकरच याची उकल होण्याची शक्यता आहे.*

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here