पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी),स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा ०२,कार्तिकी यात्रा २०२१

वारकरी भाविकांनी सूचनांचे पालन करणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे यात्रेकरू व भाविकांना नम्र आवाहन.

कार्तिक यात्रा २०२1
यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन

पंढरपूर हे भुवैकुंठ नगरी आहे. या भुवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक, भक्‍त यात्रेकरुंचे हार्दिक स्वागत आहे.
या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या पर्वाचे आद्य कर्तव्य आहे.


सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणेकरीता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
१) यात्रेकरु, दिंडीकरी, फडकरी, भाविकभक्त इ. यांची सोय नवीन पुलाशेजारी सोलापूर रोडलगतच्या
भक्‍ती सागर ६५ एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे.
२) उघड्यावर शौचास बसु नये प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या
शौचालयाचा वापर करावा.
३) शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा.
४) पत्रावळी व द्रोणचा वापर :- जेवणाकरीता थर्माकोल,प्लॉस्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याएवजी
पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा, द्रोणचा वापर करावा व प्लॉस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा
पर्यावरणाचा समतोल साधावा.
५) कचरा व्यवस्थापन :- आपल्या मठ/संस्था इ. मध्ये निर्माण होणारा कचरा/पत्रावळी द्रोण, शिळे खरकटे अन्न
इ.दोन मोठ्या टिपामध्ये ओला व सुका असा वेगवेगळा साठवून ठेवावा नगरपालीकेची घंटा गाडी आल्यावर
त्यामध्ये द्यावा.
६) नदीचे व बोअरचे पाणी पिऊ नये, नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे.
७) शिळे अन्न, नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये.
८) धोकादायक इमारतीमध्ये राहू नये.
९) कोरोना (कोविड – १९) :- या आजाराचे प्रतिबंधक उपाय योजना अनुषंगाने यात्रेकरुंनी सार्वजनीक ठिकाणी
चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे व सुरक्षित अंतर राखणे इ.सूचनांचे पालनकरावे.
१०) पार्कींग व्यवस्था ठिकाणे :- अंबाबाई पटांगण,संत गजानन महाराज मठामागे, इसबावी विसावा मंदिरा समोर,
सांगोला रोड एम.एस.ई.बी.समोर, कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मरिआई पटांगण,
कराड रोड, गौतम विद्यालय जागेत, वेअर हाऊस जवळ इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यत आलेलीआहे.

 

सौ. साधनाताई ना.भोसले
(नगराध्यक्ष, न.पा. पंढरपूर)

सौ. श्वेताताई डोंबे
(उपनगराध्यक्ष, न.पा. पंढरपूर)

श्री. अरविंद माळी
(मुख्याधिकारी, न.पा. पंढरपूर)

सर्व सभापती व नगरसेवक पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here