*कार्तिकी यात्रा : कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण*

पंढरपूर :-
कार्तिकी शुध्द एकादशीला म्हणजे दिनांक 02 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रा संपन्न होत आहे. या दिवशी उपमुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी असते. सदर यात्रा शांततेत व नियोजनबध्द पध्दतीने पार पाडणेकामी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मंदिर समितीच्या कर्मचा-यांना व स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

कार्तिकी यात्रा 2025 निमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण व प्रात्यक्षिके बाबत दि. 26 नोव्हेंबर रोजी श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बीमल नथवाणी, हनुमान चौधरी व रमेश मिश्रा यांनी आपत्ती व्यवस्थापन बाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिते दिली. सदरचे प्रशिक्षण हे यात्रा कालावधीच्या दृष्टीने खुप उपयोगी होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास मंदिर समितीकडील सुमारे 250 कर्मचारी / स्वयंसेवक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याचे यावेळी श्री राऊत यांनी सांगीतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here