नवरात्र महोत्सव साठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मौल्यवान अलंकारांची गाठवणी पूर्ण

पंढरपूर :-
श्री क्षेत्र पंढरपूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विविध स्तरांवर पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. नवरात्र महोत्सवादरम्यान श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस विविध पारंपरिक पोशाख व धार्मिक विधींनुसार परिधान करण्यात येणारे पारंपरिक व मौल्यवान सुवर्ण अलंकार अत्यंत महत्त्वाचे असतात. या अलंकारांची सुरक्षित गाठवणी, तपासणी व आवश्यक ती पूर्वतयारी नवरात्र महोत्सवापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असते.

त्यानुसार दि. २७ सप्टेंबर २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या विविध मौल्यवान अलंकारांची गाठवणी करण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहे. अलंकारांची सुरक्षितता, त्यांची नोंद, जतन तसेच पुढील धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक नियोजन याबाबत विशेष काळजी घेण्यात आली आहे. शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ ची तयारी जोमाने सुरू करण्यात आली असून, भाविकांना नवरात्रोत्सवाचा धार्मिक व भक्तिमय अनुभव सुरळीतपणे घेता यावा, यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती व्यवस्थापक श्री. प्रवीण कुमार घम यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here