*
पंढरपूर, दि. १० :-
गोकुळ अष्टमी व बैल पोळा उत्सव निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलास आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी अलंकृत करण्यात आले. पारंपरिक अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठलाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
गोकुळ अष्टमी व बैल पोळा उत्सव निमित्त श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, मोत्याचा तुरा, नाम हिऱ्याचा,कौस्तुभ मणी,दंडपेट्यात जोड मोठा, हिऱ्याचे कंगनजोड, मोत्याची कंठी दोन पदरी, शिरपेच लहान, शिरपेच मोठा, मस्त्य जोड, लक्ष्मी हार, अष्टपैलू मण्याची कंठी तीन पदरी, तांदळा हार सात पदरी, एकदानी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी, तोडेजोड आदी पारंपरिक व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले.
गोकुळ अष्टमी व बैल पोळ्याच्या पावन पर्वानिमित्त श्री विठ्ठलाचे हे मनोहारी रूप भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले असून, भाविकांनी भक्तिभावाने श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले.
याबाबतची माहिती समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.



















