पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई 66 मोटरसायकलीसह आठ जण ताब्यात

पंढरपूर — प्रतिनिधी
पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोटारसायकल चोरी करणा-या टोळी विरूध्द धडक कारवाई आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडुन २१,३०,०००/- रूपये किंमतीच्या एकुण तब्बल ६४ मोटार सायकली केल्या जप्त

  1. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत पंढरपुर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे उद्देशाने मा. श्री विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांची तीन विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटार सायकल चोरी जाणेचे प्रमाण जास्त आहे.
  2. त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवुन गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने मोटार सायकली चोरीबाबतची माहिती काढणेचे काम सुरू असताना बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की, एक इसम पंढरपुर टाकळी बायपास येथे चोरीचे मोटारसायकल विक्री करणेकरीता येणार असलेबाबतची माहिती मिळालेने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन त्याठिकाणी संशयास्पदरित्या फिरत असलेल्या इसमास ताब्यात घेतले.
    व पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, त्याने आपण चोरीची मोटारसायकल विक्री करीता घेवुन आलो असलेची सांगीतलेने त्याचेकडे सलगपणे चौकशी केली असता त्याने आपण तसेच आपले साथीदारांनी पंढरपूर शहर व परिसरातील त्याचप्रमाणे सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड या जिल्ह्यातून देखील मोटरसायकली चोरल्याचे सांगीतले. या सर्व संशयितांच्या वास्तव्याची माहिती हस्तगत करून घेवुन त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा सखोल तपास केला असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नंबर १) ६७५/२०२१२) ७२/२०२२३) ४४३ / २०२२४) ४४६ / २०२२५) ४४७ २०२२ ६) ४५२/२०२२ हे गुन्हे केल्याचे कबूल करून या सर्व गुन्हयातील व इतर ठिकाणी चोरलेल्या ६४ मोटरसायकली आरोपीतांनी काढुन दिलेने या सर्व मोटार सायकली गुन्हयाचे तपासकामी जप्त करणेत आल्या आहेत.वरील प्रमाणे गुन्हयात जप्त केलेल्या मोटारसायकली हया पंढरपुर शहरातुन व परिसरातुन तसेच सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर, पुणे,अहमदनगर, बीड या जिल्हयातील आहेत. सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री. विक्रम कदम, व श्री. अरुण पवार, पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी. व्ही केंद्रे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ बिपीन ढेरे, सुरज हेंबाडे, पोहेकॉ शरद कदम, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनिल बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंबाडे सुजित जाधव पोलीस कॉ. समाधान माने तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉ.अन्वर आतार यांनी केले आहे
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here