सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीची खर्डी येथे सभा संपन्न
प्रतिनिधी पंढरपूर/-
विठ्ठलची दुरवस्था पाहून विठ्ठल चे सभासदांनी भगीरथ भालके यांनी दूर लोटले. सहकार शिरोमणीची निवडणूक लागताच कल्याणराव काळे यांच्या मदतीला भालके आणि दोन पाटील एकत्र आले. या निवडणुकीनंतर आपली राजकीय कारकीर्द थांबणार या भीतीनेच हे सर्वजण एकत्र आले आहेत. परंतु या निवडणुकीत या चौघांनाही आडवे केल्याशिवाय सभासद स्वस्थ बसणार नाहीत .असे मत विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.
सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी परिवर्तन घडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या भितीनेच कल्याणराव काळे खालच्या पातळीवर टिका करत आहेत. त्यांच्या अशा बेताल वक्तव्याची सभासद मतदान करुन परत फेड करतील असा विश्वास डाॅ.बी.पी.रोंगे यांनी व्यक्त केला.
सहकार शिरोमणी श्री विठ्ठल परिर्वतन विकास आघाडीची खर्डी येथे प्रचार सभा झाली. त्या सभेत बोलताना डाॅ.रोंगे यांनी काळे यांच्यावर निशाना साधला. सिताराम महाराज साखर कारखाना उभा करताना खर्डी येथील शेकडो शेतकर्यांनी मदत केली होती. त्याच लोकांना आता पैशासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अशा नतदृष्ट लोकांना फसविणार्या सत्ताधार्यांचे दिवस भरले आहेत अशी टिकाही केली.
सभेला विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील, दिपक पवार, सुभाष भोसले, सचिन पाटील आदी उपस्थि होते. डाॅ.रोंगे म्हणाले की, सहकार शिरोमणीच्या उभारणीला सुमारे 22 वर्षे झाली. तरीही सभासदांना वेळेवर ऊसाचे बिल मिळत नाही. कामगारांना पगार दिला जात नाही. काळे यांची कारखान्यात हुकूमशाही आहे. त्यांची ही हुकमशाही मोडून काढण्याचा संकल्प सभासदांनी केला आहे. काळे हे वारसाने राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची किंमत नाही. कारखान्याचा कारभार कसा चालवावा याचे ज्ञान नाही. त्यामुऴे कारखाना कर्जबाजारी झाला आहे. कर्तृत्व आणि नेतृत्व सिध्द करण्यात ते अपयशी ठरले आहेत. अशा लोकांना खड्या सारखे बाजूल करण्याची हीच योग्य वेळ आली आहे.
तालुक्यातील सभासदांनी यावेळी परिवर्तन करण्याचा पक्का निर्धार केला आहे. त्यामुळे काळेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते खालच्या पातळीवर जावून टिका करत आहेत. अशा टिकेला आम्ही भीक घालत नाही. सत्तांतरा नंतर त्यांना जनतेच्या समोर उघड करु असा इशाराही श्री. रोंगे यांनी दिला.यावेळी अभिजीत पाटील यांनाही काळे व त्यांच्या सहकार्यांच्या चांगलाच समाचार घेतला.