पोक्सो प्रकरणातील आरोपीस तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

*ॲड.दत्तात्रय नवनाथ सरडे व ॲड .सारिका माने -गायकवाड यांचा प्रभावी युक्तिवाद*
पंढरपूर :-
फिर्यादीतील त्रुटी व विसंगती,पुराव्यानिशी मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मे. न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पंढरपूर येथील पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस.)2023 चे कलम 137(2),तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 64(1),64(2)(i) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 4,6,8,12, प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात आरोपी याचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15/06/2026 रोजी फिर्यादीची भाची (अ .ब.क.)ही आरोपी सोबत त्यांचे घरातून क्लासला जाते सांगून निघून गेलेली होती.सदर फिर्यादीचे भाची (अ .ब. क.) व आरोपी हिचे प्रेमसंबंध असल्याने दोघे पंढरपूर येथून निघून गेले असल्याचे समजले घटने प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपीकडून अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात बी. एन .एस 482 प्रमाणे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी याचे तर्फे ॲड.दत्तात्रय नवनाथ सरडे व ॲड . सारिका माने – गायकवाड यांनी प्रभावीपणे बाजू मांडून युक्तिवाद केला. ॲड. प्रकाश महादेव फराटे ,ॲड.शंकर देविदास आरकिले, ॲड.विकास मुळे यांनी कामकाज पाहिले.
फिर्यादीतील विविध त्रुटी , विनाकारण लावलेले आरोप, जबाब व विसंगती पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. ॲड.दत्तात्रय नवनाथ सरडे व ॲड .सारिका -माने गायकवाड यांनी केलेल्या प्रभावी युक्तिवादाचा विचार करून मे .न्यायालयाने पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here