पंढरपुर शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगीरी 55 लाखाचे सोन्याचे दागिने जप्त

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

महेश कदम
पंढरपूर:-
सदर गुन्हयातील फिर्यादीचे ओळखीचा सिध्दी ज्वेलर्स मध्ये कामास असणारा आरोपी नामे कादर रमजान मुलाणी रा. मांजरी ता. सांगोला जि. सोलापूर हा दिनांक:-२६/१०/२०२६ रोजी रात्रौ २०:०० वा.चे दरम्यान नेहमीप्रमाणे फिर्यादीचे दुकानात येवून फिर्यादी नामे-एस के आश्रफुल हक व्यव-सुवर्ण कारागीर (आरिम्पा गोल्ड,) पंढरपूर यांना सिध्दी ज्वेलर्सचे मालक रमेश शिंदे रा. वाखरी ता. पंढरपूर यांनी दुकानात ग्राहकांना दागीने दाखविण्याकरीता दागीने मागीतलेले आहे, असे सांगून खोटे बोलून एकूण ३९८.५१० ग्रॅम वजनाचे १० नग सोन्याचे घंटन घेवून गेला, ते दागीने सिध्दी ज्वेलर्स दुकानात घेवून न जाता व फिर्यादीस परत न आणून देता, फिर्यादीस खोटे बोलून फसवणूक करण्याच्या उदद्देशाने स्वतःच्या फायदया करीता परस्पर घेवून गेला होता.गु.र.नं.६८१/२०२६ भा. न्या.सं. २०२३ चे कलम-३१६ (४), ३१८ (३) प्रमाणे दिनांक:- ०५/११/२०२६ रोजी गुन्हा दाखल झाला याबाबत वरीलप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण साो, यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शना नुसार पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागातील तपास पथके तयार करून तपास केला असता, तांत्रीक बाबीचे विश्लेषन करून तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्य पूर्ण तपास करून आरोपीचा शोध घेवून सदर गुन्हयाची उकल केली आहे. यातील आरोपी कादर रमजान मुलाणी हा दिनांक:-११/१०/२०२६ रोजी मिळून आल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करून दिनांक :- १६/११/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेतली आहे. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडे वारंवार तपास केला असता तो सोन्याचे दागीनेबाबत काही एक माहिती सांगत नव्हता, आरोपीस अधिक विश्वासात घेवून सोन्याचे दागीने बाबत तपास केला असता, त्याने गुन्हयातील घेवून गेलेले सोन्याचे दागीने बाबत माहिती सांगून सोन्याचे दागीने काढून दिले आहेत. त्याप्रमाणे पोलीसांनी आरोपीकडून एकूण – ५५,००,०००/-रू. किमतीचे ३९८.५१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे १० नग घंटन त्यातील एकास सोन्याचे पदक असलेला गुन्हयातील घेवून गेलेला मुदद्दे‌माल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रेरणा कटटे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सिताराम डुबल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. महेश ढवाण यांचे मार्ग दर्शनाखाली, पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोफौ /सुजित उबाळे, पोहवा / २७४ अनिल बनसोडे, पोहवा /१४१३ अस्लम काझी, पोहवा / ८०५ गणेश पवार, पोहवा /१५८३ बापुसाहेब मोरे, पोहवा /१४८ सुनिल मोरे, पोहवा /१७८९ सचिन हॅबाडे, पोकॉ/१२४० हर्षद ठाकर, पोशि /१२१६ शहाजी मंडले, पोकॉ/१३०४ नवले, तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीणचे पोकों / १८८७ प्रविण मेटकरी, यांनी केली आहे. पुढील तपास पोहेका / १५८३ बापुसाहेब मोरे हे करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here