विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी श्रीकांत यादव यांची नियुक्ती

पंढरपूर-
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी विधी व न्याय विभागाचे कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांनी काढले आहे.
मंदिर समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची कल्याण-डोंबिवली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र, आषाढी एकादशी यात्रेच्या कालावधीमुळे त्यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. यात्रा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शेळके यांची बदली झाली
विधी व न्याय
विभागातील कक्ष अधिकारी श्रीकांत यादव यांची पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
झाली आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या प्रशासकीय कारभाराची जबाबदारी आता यादव यांच्याकडे येणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून भाविकांच्या सुविधा, धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन तसेच मंदिर परिसरातील विविध प्रशासकीय कामकाज पाहिले जाते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here