कामिका एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले.
- कामिका एकादशी निमित्त श्री श्रीकांत शिवाजी गणगले बार्शी जि. सोलापूर यांच्या वतीने आरास करण्यात आली. यात झेंडू, मोगरा, कामिनी, ब्लू डी.जे, टॅटीस, शेवंती, गुलछडी, गुलाब आदी १५ फुलांचे प्रकार व पानांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली.