भीमा सहकारी साखर कारखाना लि- टाकळी सिकंदर ता-मोहोळ जि- सोलापूर येथे चालु गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या पहिल्या ११ साखर पोती पूजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावर सकाळी १० वाजुन ३९ मिनिटांनी चेअरमन विश्वराज महाडिक यांचे प्रमुख उपस्थितीत पुळुज गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. महत्वाचं म्हणजे १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गाळपास आलेल्या ऊसाची पहिली उचल मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतरच बुधवारी हा साखर पूजन कार्यक्रम घेण्यात आला. गळीत हंगाम २०२३-२४ शुभारंभावेळी काटा पेमेंट करण्याचा दिलेला शब्द पाळत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सभासदांना केंद्रस्थानी मानूनच काम करत आहोत हे आपल्या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
दरम्यान दरवर्षी साधारणतः हंगामाच्या दुसऱ्या दिवशी साखर पोती पूजन कार्यक्रम घेतला जायचा. या परंपरेला फाटा देत “आधी लगीन कोंढाण्याचे…” याप्रमाणे अगोदर शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल आणि मग साखर पूजन हि भूमिका चेअरमन विश्वराज महाडिक यांनी घेतली. चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सर्व सभासद शेतकरी, तोडणी व वाहतूक कामगार आणि सर्व कारखाना कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचं आवाहन केलं. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यमान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री.शिंदे साहेब,अधिकारी, कर्मचारी,सभासद,शेतकरी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
*”…चेअरमन नव्हे तर एक सेवक” या वाक्याचा हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात प्रत्यय..!*
राज्य सरकारने यावर्षी एफआरपी पूर्ण असणाऱ्या कारखान्यांना १ नोव्हेंबर पासून गाळप करण्यास परवानगी दिली त्याप्रमाणे भीमाचे गाळप चाचणी १ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. कारखाना हंगाम सुरु होताना ट्रायल वेळी मशिनरी अथवा पम्पिंग मध्ये तांत्रिक अडचण येणे हि सामान्य गोष्ट असते. हंगाम शुभारंभावेळी कर्मचारी वर्गाला ५० तासांपेक्षा कमी डाऊनटाईमचं उद्दिष्ट देत असतानाच विश्वराज यांनी “मी कारखान्याचा चेअरमन नव्हे तर तुमच्याप्रमाणेच एक सेवक आहे. गरज पडेल त्या त्यावेळी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेन” अशी खात्री दिली होती. ट्रायल वेळी सुरुवातीला साखर पोत्यात पडेपर्यंत स्वतः उपस्थित राहत “…चेअरमन नव्हे तर एक सेवक आहे” हे वाक्य फक्त बोलूनच नाही तर तोलून सुद्धा दाखवलं. यामुळे साहजिकच कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये चेअरमन विश्वराज महाडिक यांच्याबद्दल विश्वासाचं व आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे.
*कर्मचाऱ्यांची देखील दिवाळी गोड.. एक पगार दिवाळी बोनस खात्यावर जमा..!*
भीमाच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ किलो स्वतंत्र पॅकिंगद्वारे मोफत साखर वाटप करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के म्हणजेच एक पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची घोषणा करण्यात
आली होती. आज साखर पोती पूजनप्रसंगी दिवाळी बोनस सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला असल्याची माहिती विश्वराज महाडिक यांनी दिली. मोफत साखर, दिवाळी बोनस एक पगार यामुळे भीमाच्या कर्मचाऱ्यांची यावर्षीची दिवाळी गोड होणार आहे.