प्रतिनिधी :-
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. टेम्भूर्णी येथे माढा, पंढरपूर आणि मोहोळ, माळशिरस विधानसभा मतदार संघातील राष्ठ्रवादीचे उमेदवार अनुक्रमे अभिजित पाटील, अनिल सावंत आणि राजू खरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खा. पवार यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील, खा. धैर्यशील मोहिते – पाटील, उमेदवार अनिल सावंत, अभिजित पाटील, राजू खरे, उत्तम जानकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. शरद पवार यांनी सांगितले कि,पंढरपूर — मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत आहेत आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. अनिल सावंत यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या समोर मोठे आव्हान उभा केले आहे. गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पंढरपूरमध्ये तर रविवारी पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांची मंगळवेढा येथे प्रचार सभा संपन्न झाली. त्यानंतर खा. शरद पवार यांनीही अनिल सावंत यांच्या विजयासाठी टेम्भूर्णी येथील भव्य सभेत मतदारांना आवाहन केले आहे, या सभांमुळे मतदारसंघात अनिल सावंत यांचे मोठे आव्हान निर्माण झाला आहे.



















