पंढरपूर (प्रतिनिधी):-
तीन हजार कोटींचा निधी पंढरपूर तालुक्यातील सर्व गावांमधून विकासासाठी खर्च केला असे आमदार सांगत फिरत आहेत.प्रत्येक गावात तीस कोटी रुपये खर्च केल्यास शंभर गावे तीस कोटी रुपये खर्च केल्यास तीन हजार कोटी रुपये होतात .मग सर्व सुविधा का झाल्या नाहीत.हे मतदारांनी आमदाराला विचारावे.असे मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी कोर्टी गावातील गावभेट दौरा मध्ये बोलत असताना ते म्हणाले.
कार्यालयात पैसे दिल्याशिवाय घरकूल योजना मंजूर होत नाही.
बेरोजगार युवकांना रोजगार नाही.शिकून झालेले तरुण गाव सोडून पुणे मुंबई ला जात आहेत.पंढरपूर तालुक्याला एम आय डी सी नाही.जर या ठिकाणी उद्योग धंदे आल्यास गावातील सर्व तरुणांना काम मिळू शकते . परंतु या पंढरपूर तालुक्यात उद्योग धंदे येऊ नये म्हणून हे भाजपाचे नेते विरोध करीत आहे.
सुशिक्षित तरुण वर्गही आपल्या मागे फिरला पाहिजे अशी मानसिकता या नेतेंची आहे.हे सर्व संपवायचे असेल तर मला एक वेळ संधी द्या मी सर्व बदल केल्याशिवाय राहणार नाही.
एमआयडीसीला विरोध करणाऱ्या भाजपाचा नेत्यांना घरी बसवले पाहिजे टाटा बिर्ला अंबानी यांच्यासारख्या उद्योजक लोकांना मी भेटून एमआयडीसीमध्ये आपले उद्योगधंदे सुरू करावे अशी विनंती करणारा मी आहे .शेतकरी बांधवांनी उसाची काळजी करू नका. उसाची अडचण येऊ देणार नाही. शेतकऱ्यांना पैशाची गरज असते ती गरज भागवण्यासाठी माझ्याकडे या मी मदत करीन असे आश्वासन मनसेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज कोर्टी येथे गाव भेटीच्या दरम्यान कोटी ग्रामस्थांना दिले.