*राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना लक्ष्मी टाकळीतील आजी-माजी अध्यक्ष, संचालकांचा पाठिंबा*

प्रतिनिधी :-
पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच होताना दिसून येत आहे यामध्येच काल राष्ट्रवादीचे डॉ अमोल कोल्हे यांनी पंढरपूर येथे उमेदवार अनिल सावंत यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देऊन सर्व गोष्टींचा खुलासा केला. आपला विरोधक फक्त आणि फक्त भाजप पक्ष आहे आणि विद्यमान आमदार आहेत. तर आज अनिल सावंत यांनी पंढरपूर मधील गावांचा झंझावाती दौरा सुरु केला त्यातच लक्ष्मी टाकळी येथे अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात गतवेळी दोन वर्ष दोन्ही मतदारसंघांमध्ये पंढरपूर असेल मंगळवेढा असेल या मतदारसंघांमध्ये गाव बैठक घेऊन प्रचार केला आणि निवडणुकी पुरती आश्वासने दिल्याने त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना मतदान केले अशा भावना व्यक्त केल्या . पण त्यांनी काय केले ? असा सवाल हि मतदारांना संबोधित करताना नेत्यांनी केला आधीच्या नेत्यांनी सगळ्यांचा विश्वास तोडला असे नमूद केले , विद्यमान आमदारांना की ज्या माणसांच्या,मतदारांच्या पाठीमागे लागून आपण खुर्चीवर बसला त्याच माणसांना आपण वाऱ्यावरती सोडले ही परिस्थिती जर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची असेल तर आपल्या सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचे काय होणार या भागामध्ये विकास करत असताना एवढ्या कोटीचा निधी आणला तेवढ्या एवढ्या कोटीचा विकास निधी आणला अशा व वलग्ना करणारे विद्यमान आमदार खरंच या भागात विकास झाला का..? जेवढा निधी आणला त्याच पद्धतीचा विकास झालाय का नाही हे माझ्यापेक्षा आपल्या लोकांना अधिक तरुण पिढीला तुमच्यासारख्या समोर बसलेल्या मातांना भगिनींना चांगलं माहिती असल्याचे प्रतिपादन उमेदवार अनिल सावंत यांनी केले.

अनिल दादा सावंत यांना लक्ष्मी टाकळी येथील अनेक आजी माजी अध्यक्षचा यांचा पाठींबा
आज लक्ष्मी टाकळी येथे परमेश्वर लक्ष्मण देठे, माजी संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना. मा.संचालक पंढरपूर मार्केट कमिटी. महादेव मारुती देठे माझी संचालक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना. मच्छिंद्र अर्जुन देठे प्रगतशील बागायतदार. रघुनाथ विठ्ठल देठे. हनुमंत शिवाजी देठे. मारुती सुखदेव रवळू. नाथा रमेश देठे.

राजेंद्र रंगनाथ बागडे. बजरंग महादेव देठे. धर्मा गोवर्धन लवंड. विशाल बंडू देठे अधिक कार्यकर्त्यांनी अनिल दादासावंत साहेब गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी लक्ष्मी टाकळी गावातील तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here