*पंढरपूर करकंब रोडवर अहिल्या चौकाच्यापुढे भाविकांच्या ट्रॅव्हल्स बस व ट्रकचा भीषण अपघात*

पंढरपूर :-
पंढरपूर करकंब रोडवर अहिल्या चौकाच्यापुढे भाविकांच्या ट्रॅव्हल्स बस व ट्रकचा भीषण अपघात. दोन जागीच ठार
ट्रॅव्हल्स मध्ये एकूण 50ते 60 भाविक प्रवासी असल्याचा अंदाज

अपघातामध्ये दोन जागेवर ठार 15 जण जखमी. अपघातामध्ये ठार झालेली एक महिला व एक 15 वर्षीय मुलगी .

ट्रॅव्हल्स मध्ये एकूण 50ते 60 भाविक प्रवासी असल्याचा अंदाज.

राजनंदिनी ट्रॅव्हल्स ही मावळचे आमदार शेळके यांच्या मतदार संघातील भाविकांना घेऊन तुळजापूर, पंढरपूर दर्शन करून पुन्हा आपल्या गावाकडे परतत असताना शेजारची घटना घडली आहे मावळचे आमदार शेळके हे पुन्हा आमदार होऊ दे म्हणून सदर मतदारसंघातील भाविकांनी तुळजापूर व पंढरपूर देवाकडे नवस करण्यात आले होते . पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन करून पंढरपूरहून भाविक पुन्हा आपल्या गावी जात असताना घटना घडली आहे.

पंढरपूर करकंब रोडवर अहिल्या चौकाच्या पुढे खेडलेकर मठाजवळ आज रविवार दिनांक 29 डिसेंबर2024 रोजी सकाळी 7वाजता पंढरपूरहून भाविकांना घेऊन जाणारी राजनंदिनी ट्रॅव्हल्स MH 14LS 3955 तर BTC कंपनीचा मालवाहतूक ट्रक नं RJ .14.GL.1780 हा करकंबकडून पंढरपूर कडे येत असताना हा भीषण अपघात घडला आहे. सदर अपघातामध्ये एक अंदाजे वय 60 वर्षअसणारी महिला व 15 वर्षाची मुलगी या अपघातामध्ये जागेवरच ठार झाले आहे . बस चालक ड्रायव्हर याचे दोन्ही पाय 5 ते 6 ठिकाणी तुटले आहेत. सदरची घटना खेडेकर मठा समोर भटुंबरे हद्दीत घडल्याने भटुंबरे येथील शेंबडे कारंडे व इतर लोकांनी जेसीबीच्या साह्याने मदत करून मृत्यू झालेल्या व बसमध्ये अडकलेल्या लोकांना व जखमींना बाहेर काढण्यास मदत केलीआहे.

त्याचबरोबर यामध्ये अंदाजे जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी पंढरपूर येथील पाठवण्यात आले आहे. सदर घडलेली घटना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना समजतात घटनास्थळी स्वतः व त्यांचे पोलीस कर्मचारी घेऊन जखमीना मदत व पुढील कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here