पंढरपूर, दि:–
राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री खांडेकर, प्र.तहसीलदार सचिन मुळीक, कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.