संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 165 प्रकरणे मंजूर

 पंढरपूर, दि. 03:-  तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 165  प्रकरणे समीतीच्या सभेत मंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 82 प्रकरणे  व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 83 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
  राज्यशासनामार्फत संजय गांधी निराधार योनेत निराधार, वृध्पकाळ, अपंगत्व, विधवा, दुर्धर आजार व मानसिक आजाराने ग्रस्त नागरिक तसेच श्रावणबाळ योजनेत 65 वर्षावरील वृध्द निराधार व्यक्तींना लाभ दिला जातो. या योजनेचा तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांनी लाभ  घ्यावा. तसेच  ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यांनी बँक पास बुकची छायाकिंत प्रत व फोटो तात्काळ तहसिल कार्यालय पंढरपूर येथे जमा करावेत असे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील जे लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना अनुदानाचा लाभ घेत आहे आहेत. अशा लाभार्थ्यांनी माहे जून पर्यंत हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र  प्रत्यक्ष हजर  राहून  सादर करावेत. अन्यथा माहे जुलै  पासून संबधित लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येईल असे आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी केले आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here