*पंढरपुरचे विठ्ठल मंदिर खुले रंगीबेरंगी* *फुलांची आकर्षक सजावट*

नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस विठ्ठल मंदिर उघडले दर्शनासाठी येणार्‍या पहिल्या भाविकाचे पुष्पवृष्टीसहीत स्वागत मंदिर समितीने केले. नवरात्री निमित्त मंदिरास
तुळस, झेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, जरबेरा, कागदा, कामिनी फुलांनी सजला विठ्ठल मंदिराचा गाभारा
सकाळी सहा वाजता मंदिराचा दाळ उघडण्यात आलं
ज्याच्या दर्शनाची आस लागली होती त्या सावळ्या विठुरायाचे मुख दर्शन भाविकांना घेता आले.
आज सकाळी सहा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मंदिर समितीच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. करोनाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडण्यात आली आहेत.आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

विठुरायाच्या दर्शनाची आस लागली होती. दि. ५ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील सर्व मंदिरे करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आज राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहेत. राज्य सरकारने करोनाचे नियमांचे पालन करून मंदिरे उघ्द्न्यास परवानगी दिली.या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिर,दर्शन रांग येथे स्वच्छता आणि निर्जानातुकीकरण केले.

मुख दर्शनासाठी कासार घाट येथे तापमान तपासणे,सँनिटायझर देवून रांगेत पाठविले जात आहेत. येथील नामदेव पायरी येथे आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.तसेच पुण्यातील राम जांभूळकर या भाविकाने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. यात तुळस, झेंडू, गुलाब, अष्टर, शेवंती, जरबेरा, कागदा, कामिनी या फुलांचे १० ते १५ प्रकार वापरण्यात आले आहेत. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा तसेच मंदिरात ही साजावट करण्यात आल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे. तर आज देवाचे नित्योपचार ठरलेल्या वेळेत करण्यात आले. त्यानंतर सकाळी ६ वाजता मंदिराचे दार उघडण्यात आले.

रांगेतील पहिल्या भाविकांचे समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यासहीत अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिर समितीच्या कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. तसेच प्रातिनिधिक पहिल्या ५ भाविकांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी करोनाच्या नियमाचे पालन करावे. स्थानिक नागरिकांसाठी रोज सकाळी ६ ते ७ या कालावधीत दर्शनाची सोय समितीने केली असल्याची माहिती सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी बीड वरून आलेल्या महिला भाविकाने देवाचे दर्शन मिळाल्यावर भावनिक होत दोन हात जोडत खूप समाधान झाले असे म्हणत दोन्ही डोळे भरून आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here