सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या आदेशान्वये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ व गुटखा यावर कारवाईच्या विशेष मोहिमे अंतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम सा. पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम चालू असताना गार्डी येथे राहणारा विजय शंकर हिंगमिरे आपले घरी गुटखा बाळगून असुन विक्री करीत आहे अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना मिळाले वरून पोलीस उप निरीक्षक गोदे यांच्यासह पंचासमक्ष छापा घातला असता महाराष्ट्र राज्यात गुटखा निर्मिती करणे, वाहतुक करणे, बाळगणे, विक्री मनाई असताना देखील खालील प्रमाणे अवैधरित्या गुटका मिळाला असुन सदर बाबत अन्न व औषध भेसळ विभाग सोलापुर यांना कळविण्यात आल्यानंतर सदर विभागाचे अधिकारी यांनी आज रोजी पंढरपूर पोलीस ठाणे ग्रामीण येथे येऊन त्याबाबत पंचनामा कारवाई करून व फिर्याद दाखल केल्याने आरोपी नामे 1. विजय हिंगमिरे 2. बाबासाहेब यांचे विरुद्ध विविध कलमान्वये पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यास ताब्यात घेऊन खात्री करून त्यास अटक केली आहे सदर बाबत विजय शंकर हिंगमिरे यांने सदरचा गुटखा कुठून आणला, यात कोणाकोणाचा सहभाग आहे ? कोण कोण साथीदार आहेत ? पुरवठादार कोण कोण आहेत ? तपासादरम्यान या बाबत सखोल तपास करण्यात येणार आहे.
तपासकामी आरोपीचा दि. 11/10/2021 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे.
Home गुन्हेगारी *पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील गुटखा विक्रेत्यांवर धाड* *पंढरपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई*