पंढरपूर (ता.01):-
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त आज (शुक्रवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.


सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. यासाठी शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब, रॉकेट, ब्लू डीजी इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे.


सदरची सजावट विठ्ठल भक्त युवराज सोनार, विजय सोनार, दादासाहेब पोकळे व सचिन चव्हाण, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे.


















